Skip to content Skip to footer

केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेल लावताय? मग जाणून घ्या तेल लावण्याची योग्य पद्धत

बदलत्या वातावरणाचा आणि आहाराचा परिणाम हा थेट आपल्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा वजन वाढणे, केस गळणे किंवा अन्य शारीरिक तक्रारी जाणवू लागतात. यामध्येच सध्या अनेक जण केसगळतीने त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे अनेकदा काही जण महागडे औषधोपचार करतात.तर, काही जण घरगुती उपाय करतात. यात बहुतांश वेळा एरंडेल तेल लावण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, हे तेल नेमकं कसं लावावं हेच अनेकांना ठावूक नसतं. त्यामुळे एरंडेल तेल कसं लावायचं हे जाणून घेऊयात.

एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषणतत्वे असतात. त्यामुळे केस वाढीसाठी हे तेल अत्यंत फायदेशीर आहे. या तेलामुळे रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते. तसंच केसगळती लगेच कमी होते. विशेष म्हणजे या तेलामुळे केवळ केसगळतीच नाही तर डोक्यात कोंडा होणे, टाळूला खाज सुटणे या समस्यादेखील दूर होतात.

तेल लावण्याची पद्धत – १
केसांची वाढ होण्यासाठी एरंडेल तेलात २ मोठे चमचे आल्याचा रस घालावा. त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण केसांना आणि टाळूला लावावे. त्यानंतर अर्ध्या तासाने केस शाम्पू लावून धुवावेत. आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करावा. त्यामुळे केस गळती कमी होऊन केसांची वाढ लवकर होते.

तेल लावण्याची पद्धत – २
आवश्यकतेनुसार, एरंडेल तेल घेऊन त्यात २-३ चमचे कोरफडीचा रस आणि टी ट्री ऑइलचे ३ थेंब टाका. आता हे मिश्रण एकत्र मिक्स करा. तयार मिश्रण केसांना ३० के ४० मिनिटांपर्यंत लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून ३-४ वेळा हा उपाय करा.

तेल लावण्याची पद्धत – ३
एरंडेल तेल, बदामाचं तेल, नारळाचं तेल,ऑलिव्ह ऑइल हे चारही तेल समप्रमाणात घेऊन मंद आचेवर गरम करा. त्यात भरपूर कढीपत्त्याची पानं घाला आणि हे तेल छान मंद आचेवर उकळून घ्या. त्यानंतर तेल थंड झाल्यावर एका बाटलीत भरुन ठेवा. आठवड्यातून ४-५ वेळा हे तेल लावा किंवा आठवड्यातून २ वेळा केस धुण्यापूर्वी अर्धा तास हे तेल लावून ठेवा.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Leave a comment

0.0/5