Skip to content Skip to footer

पाकिस्तानात बॉम्बस्फोट; अधिकाऱ्यासह तिघांचा मृत्यू

क्वेट्टा : पाकिस्तानच्या नेऋत्य भागात आज (गुरुवार) बॉम्बस्फोट झाला. पाकिस्तानात बॉम्बस्फोट मध्ये एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर दोघे असा एकूण तीनजणांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बलुचिस्तानमध्ये मागील वर्षी झालेल्या एकामागून झालेल्या हल्ल्यांमुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले होते. वर्षभरातील हल्ल्यांमध्ये सुमारे 180 जण मृत्युमुखी पडले. यामुळे या भागातील इसिसशी संबंधित व इतर दहशतवाद्यांचे अस्तित्व हा चिंतेचा विषय बनला आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील आर्थिक सहकार्याने या भागात उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे 5700 कोटी डॉलर एवढा खर्च करून नियोजित वाहतूक यंत्रणा, तसेच पश्चिम चीनपासून ते दक्षिण पाकिस्तानातील ग्वादार बेटापर्यंत विद्यूत पुरवठा हे प्रकल्प उभारण्यात येत आहेत.

https://maharashtrabulletin.com/las-vegas-shooting-music-festival/

“या बॉम्बस्फोटात अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक हमीद शकील आणि त्यांचा वाहनचालक यांच्यासह एकूण तीनजणांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती येथील प्रांताचे सरकारी प्रवक्ते अन्वर उल हक काकर यांनी वृत्तसंस्थेला दिली. “शकील हे त्यांच्या वाहनाने बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे जात असताना हा बॉम्बस्फोट झाला. त्यांच्या वाहनालाच या हल्ल्याचे लक्ष्य करण्यात आले होते. यामध्ये शकील आणि त्यांच्या वाहनचालकाचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला बलुचिस्तानचे पोलिस महानिरीक्षक मोझम जाह यांनी दुजोरा दिला.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5