Skip to content Skip to footer

अमेरिका-रशिया असामान्य संबंधांच्या दिशेने 

हेलसिंकी (फिनलंड) : अमेरिका आणि रशिया यांच्यातील संबंध भलेही चढउताराचे राहिले असतील. मात्र, सोमवारी दोन्ही देशांचे नेते भेटले, त्या वेळी त्यांच्यात उत्कृष्ट संबंध प्रस्थापित करण्याची उत्सुकता दिसून आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यानच्या ऐतिहासिक शिखर बैठकीची सुरवात आशादायक झाली. ट्रम्प यांनी असामान्य संबंधांचे आश्‍वासन दिले, तर पुतीन यांनी जगभरातील वाद मिटविणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.

बैठकीदरम्यान ट्रम्प म्हणाले, की अमेरिका आणि रशिया एकत्रित वाटचाल करत नव्हते. मात्र, आता जग या दोन्ही देशांना एकत्रित पाहण्यास उत्सुक आहे, असे मला वाटते. पुतीन म्हणाले, की ट्रम्प यांनी नेहमीच दूरध्वनीद्वारे, तसेच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांदरम्यान चर्चा करत संपर्क कायम राखला. आम्ही वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय समस्या आणि संवेदनशील मुद्यांवर चर्चा करण्याची आता वेळ आली आहे.

बैठकीदरम्यान पुतीन यांच्यासमक्ष निवडणुकांमधील रशियन हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ट्रम्प यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात आहे. त्यामुळे दोन्ही नेते यासंबंधी चर्चा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुतीन अर्धा तास उशिरा पोचल्यामुळे हेलसिंकीमधील बैठक थोडी उशिरा सुरू झाली. मात्र, ट्रम्प यांनी त्यांची प्रतीक्षा करून सहकार्य केले.

क्षेपणास्त्रे, अणुशक्ती, चीनपर्यंत सर्व मुद्दे विचारात घेतले जातील.
– डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 

Russia America relation is in new wayvia अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5