इंग्लंड : इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिन्स विल्यम्स आणि त्याच्या पत्नीने लहान मुलांसाठी राजवाड्यात स्मार्टफोन वापरायला बंदी केली. जे त्यांना जमले, ते आपल्याला जमेल का? त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या वयात लहान मुलांनी खेळावे, बागडावे, बालसुलभ खोड्या काढाव्यात या गोष्टी नैसर्गिकरीत्या अपेक्षित आहेत, त्या वयात हल्लीची मुले आपला बराचसा वेळ घरात बसून स्मार्टफोनवर खेळताना दिसत आहेत.
हल्लीचे पालकही ‘आमची मुले बघा किती स्मार्ट आहेत, काहीही न शिकवतासुद्धा मोबाईल हाताळतात,’ असे अभिमानाने सांगताना दिसतात. मात्र, ती अभिमानाची गोष्ट नाही. उलट ते काळजीचे कारण आहे. पूर्वी मुले शाळेतून घरी आली, दप्तर टाकले की, कधी अंगणात खेळायला जातो, असे त्यांना व्हायचे; पण त्या अंगणाची किंवा मैदानाची जागा आता मोबाईलच्या स्क्रीनने घेतली आहे. या सर्वांचा वाईट परिणाम अप्रत्यक्षपणे मुलांच्या मन व शरीरावर होत आहे.
मैदानी खेळ सुटल्याने मुले शारीरिक व्यायामाला मुकत चालली आहे. त्याचा परिणाम त्यांच्या शरीरस्वास्थ्यावर होत आहे. तेव्हा वेळीच सावध व्हा. मुलांनी किती वेळ स्मार्टफोन वापरावा, हे सुज्ञ पालकांनी ठरविले पाहिजे.
https://maharashtrabulletin.com/2-year-old-accidently-died-by-gun-shoot-in-us/