Skip to content Skip to footer

अमेरिकेचा भारताला ‘एसटीए-1’ दर्जा 

नवी दिल्ली (पीटीआय) : अमेरिकेने भारताचा समावेश ‘एसटीए-1’ (स्ट्रॅटेजिक ट्रेड ऑथरॉयझेशन-1) यादीत केला असून, त्यामुळे अमेरिकेतील उच्च तंत्रज्ञान आयात करण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याची माहिती भारताचे अमेरिकेतील दूत नवतेज सिंह सरना यांनी दिली.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी ३० जुलै रोजी याबाबतची घोषणा केली. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना सरना म्हणाले, “अमेरिकेचा हा निर्णय केवळ भारताप्रती वाढत असलेल्या विश्वासाचे प्रतीक नसून, आर्थिक व संरक्षण क्षेत्रांतील एक भागीदार या नात्याने भारताच्या क्षमतेला दिलेली एकप्रकारची मान्यताच आहे. या निर्णयामुळे उभय देशातील द्विपक्षी, तसेच संरक्षण संबंध आणखी मजबूत होतील.”

अमेरिकेच्या निर्यात नियंत्रण व्यवस्थेत भारताचे स्थान पाहता करण्यात आलेला हा महत्त्वपूर्ण बदल असून, भारतासोबतचे आर्थिक व संरक्षण संबंध आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळेच भारताला हा दर्जा देण्यात आल्याचे विल्बर रॉस स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेने 2016 मध्ये भारताला एक प्रमुख संरक्षण भागीदार म्हणून मान्यता दिली होती.

भारत द. आशियातील एकमेव देश 
जगभरातील 35 देशांना अमेरिकेचा ‘एसटीए-1’ दर्जा प्राप्त असून, आता भारतही त्यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. हा दर्जा प्राप्त करणारा भारत हा दक्षिण आशियातील एकमेव देश असून, आशियातील जपान, दक्षिण कोरिया या देशांचाही या यादीत समावेश आहे. नाटोचे सदस्य असलेल्या बहुतांशी देशांनाही यात स्थान देण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5