इस्लामाबाद – आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानला चीनने काही आर्थिक मदत देऊ केली आहे. त्याचा तपशील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मागवला आहे. आपल्या आर्थिक पेचप्रंसगातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडेही मदत मागितली आहे. त्यावर सध्या अधिकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पाकला मदत देण्यासाठी नाणेनिधीने त्यांच्यावर काहीं कडक अटी लादल्या आहेत.
देशांतर्गत करांचे प्रमाण वाढवणे, पाकिस्तानी चलना अवमुल्यन जाहीर करणे अशा अटी त्यांनी त्यांच्यावर टाकल्या आहेत. पण या अटी जाचक असल्याने त्या स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार दिला आहे. आम्हाला सौदी अरेबियाने 3 अब्ज डॉलर्सची मदत द्यायचे ठरवले आहे त्यातील 1 अब्ज रूपये आमच्याकडे जमा झाले आहेत आणि उर्वरीत पैसेही लवकरच मिळतील त्यामुळे आम्हाला नाणेनिधीच्या पैशाची तातडीची गरज नाही असे एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने सांगितले. आम्हाला चीनकडूनही मदत मिळेल असे हा अधिकारी म्हणाला.