Skip to content Skip to footer

हेरगिरीचा आरोप असलेला मुंबईकर पाकिस्तानातून कसा झाला मुक्त?

पाकिस्तानातल्या तरुणीशी फेसबुकवर ओळख झाल्यानंतर तिला थेट पाकिस्तानला भेटायला गेलेल्या मुंबईकर हमीद अन्सारीची पाकिस्ताननं मंगळवारी सुटका केली. दुपारच्या सुमारास लाहोरहून त्याला वाघा-अटारी सीमेमार्गे भारतात आणण्यात आलं. यावेळी त्याचे आई-वडील, भाऊ आणि भारत आणि पाकिस्तानमधल्या कैद्यांच्या प्रश्नावर काम करणारे ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई तिथे उपस्थित होते.

हमीद अन्सारी आपल्या फेसबुकवरच्या एका मैत्रिणीला भेटण्यासाठी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात गेल्यानंतर तिथे त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. लष्करी न्यायालयाने यासाठी त्याला ३ वर्षांची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची आता सुटका करण्यात आली. भारत सरकार आणि दोन्ही देशांमधल्या स्वयंसेवी संस्थांनी हमीदची सुटका होण्यासाठी पुढाकार घेतल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं.

Leave a comment

0.0/5