Skip to content Skip to footer

अवघ्या 82 रुपयांत इटलीच्या समुद्रकिनारी मिळत आहे स्वतःचे घर

रोम – आपल्या देशात घरांच्या किमती गगनाला एवढ्या भिडल्या आहेत कि घर घेण्याचे सर्वसामान्य किंवा मध्यमवर्गीय लोकांसाठी एक स्वप्नच बनून राहिले आहे. अशात अवघ्या 82 रुपयांत एक युरोपियन देश इटलीतील शहर घरे विकत आहे. अब्जांमध्ये इटलीच्या अगदी समुद्रकिनारी असलेल्या घरांची मार्केट व्हॅल्यू असेल. पण निसर्गरम्य ठिकाणी असलेली ही घरे प्रशासन अगदी विनामूल्य विकत आहे. सॅमबुका या शहराचे नाव असून ही ऑफर प्रशासनाने ठेवण्याचे एक खास कारण आहे.
italy1
इटलीचे सॅमबुका एक छोटेसे किनारपट्टीलगतचे शहर आहे. हे शहर एकेकाळी लोकांनी गजबजलेले होते. परंतु, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी शोधताना हळू-हळू लोक आपली घरे सोडून मोठ्या शहरांकडे वळले. या शहरात सद्यस्थितीला हजारो कुटुंब राहतात. परंतु, त्यातही युवकांना तेथे राहण्याची मुळीच इच्छा नसल्यामुळे, शहराला पुन्हा तीच भरारी आणि गर्दी मिळवून देण्यासाठी प्रशासनाने नवीन योजना आणली आहे. कमी किंमत पाहून लोक शहराकडे आकर्षित होतील आणि येथे येऊन स्थायिक होतील अशी सरकारला अपेक्षा आहे. आजकाल 430 ते 1610 चौरस फुटांच्या या घरांमध्ये कुणीच राहत नाही. ही घरे विकत घेण्यास प्रशासनाने इच्छुकांसाठी काही अटी ठेवल्या आहेत.
italy2
घर खरेदी करणाऱ्यांना तीन वर्षांत घराची डागडुजी पूर्ण करावी लागेल. त्यांना यासाठी अंदाजित 12 लाख रुपये खर्च येणार आहे. कारण, कित्येक वर्षांपासून रिकामे असल्याने घरांना वाळवी लागली. त्याचबरोबर 4 लाख रुपये अनामत रक्कम म्हणून जमा करावे लागतील. अर्थात किमान 16 लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. आपल्या निसर्गरम्य वातावरण आणि आल्हाददायक सागरी किनाऱ्यांसाठी सॅमबुका टाउन ओळखला जातो. वाइन यार्ड आणि घराचे सौंदर्य पाहता ही डील तेवढी वाइट नाही. विशेष म्हणजे, 2016 मध्ये इटलीने सॅमबुका शहराला देशातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक ठरवले होते.

Leave a comment

0.0/5