Skip to content Skip to footer

मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ पाकिस्तानच्या ताब्यात

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ याला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

जर मुफ्ती अब्दुल रौफ आणि त्यांच्या साथीदारांविरोधात पुरेसे सबळ पुरावे असतील तर त्यांच्यावर पुढची कारवाई करण्यात येईल असं पाकिस्तानच्या अंतर्गत सुरक्षा सचिवांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

पाकिस्तान सरकारच्या पत्रकानुसार, “नॅशनल अॅक्शन प्लॅनच्या अंमलबजावणीसाठी 4 मार्चला अंतर्गत सुरक्षा मंत्रालयात एक बैठक पार पडली. ज्यात राज्य सरकारमधील सगळ्या प्रतिनिधींची हजेरी होती. या बैठकीत कट्टरवादाचा आरोप असलेल्या संघटनांविरोधात वेगानं कारवाई करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानुसार 44 जणांवर अंतर्गत सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत. त्यातील अझहर मसूदचा भाऊ मुफ्ती अब्दुल रौफ आणि हमद अझहर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येईल. नॅशनल सिक्युरिटी कमिटीत घेतलेल्या निर्णयानुसार या प्रकरणी कारवाई करण्यात येईल.

Leave a comment

0.0/5