Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंची जन आशीर्वाद यात्रा इतिहास घडवणार?

 

शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे पुढच्या आठवड्यापासून महाराष्ट्रव्यापी जन आशीर्वाद दौरा करणार आहेत. “ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार मानायचे आहेत आणि ज्यांनी दिली नाहीत त्यांची मनं जिंकायची आहेत” अशी या दौऱ्यामागची मुख्य भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या १ ऑगस्ट पासून “विकास यात्रा” काढणार आहेत. याआधीच आदित्य ठाकरेंचा हा जन आशीर्वाद दौरा सुरु होईल. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या दौऱ्यास महत्व प्राप्त झालं असून आदित्य ठाकरेंची ही यात्रा राज्यात इतिहास घडवणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आदित्य ठाकरेंचा हा दौरा कोणत्या कारणांमुळे ऐतिहासिक ठरू शकतो यावर एक नजर:

१) महाराष्ट्रात यापूर्वी कोणत्याच युवा नेत्याने राज्यव्यापी दौरा केलेला नाही. आदित्य ठाकरे हे असा दौरा करणारे सर्वात तरुण नेते ठरतील.

२) आगामी विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं “सामना” मधून स्पष्ट करण्यात आलं आहे. शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव आघाडीवर आहे. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री झाल्यास ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरू शकतात.

३) आजवर ठाकरे परिवारातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवलेली नाही. मुख्यमंत्रीपद भूषवण्यासाठी आदित्य ठाकरेंना निवडणूक लढवावी लागेल आणि असं करणारे ते पहिले “ठाकरे” ठरतील.

४) शिवसेनेला मागील निवडणुकीत स्वबळावर लढून आजवरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. यंदा या यात्रेमुळे आणि युतीमुळे शिवसेनेच्या जागा नक्कीच वाढतील. शिवसेनेला ७२ पेक्षा जास्त जागा मिळाल्यास तो शिवसेनेच्या इतिहासातील सर्वाधिक आमदारांचा आकडा ठरेल.

५) आदित्य ठाकरेंचं वय केवळ २९ वर्षे आहे. मुख्यमंत्री झाल्यास आदित्य देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील.

एकूणच आदित्य ठाकरेंची ही जन आशीर्वाद यात्रा राजकीय इतिहास घडवणारी ठरू शकते.

वाढदिवस विशेष: दिग्गज नेत्यांनाही न जमलेल्या या गोष्टी आदित्य ठाकरे यांनी करून दाखवल्या, नक्की वाचा

Leave a comment

0.0/5