Skip to content Skip to footer

बृहमुंबई महानगर पालिकेचा कौतुकास्पद निर्णय, एचआयव्हीग्रस्त विधवांना देणार पेन्शन.

मुंबईतील एचआयव्ही बाधित विधवा महिलांना महिना एक हजार पेन्शन देण्याचा निर्णय मनपाने घेतलॆला आहे. त्यामुळे एचआयव्ही बाधित महिलांना महिन्याला एक हजार आर्थिक साहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मुंबई महानगर पालिकेकडून मिळणारे पैसे थेट महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. साधारण दोन ते तीन हजार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मुंबईत वास्तव्य करणार्‍या आणि एचआयव्हीग्रस्त व्यक्तीच्या निधनानंतर पत्नीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

एड्समुळे मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या नावाची नोंदणी एसआरटी केंद्रात केलेली असावी. पतीच्या मृत्यूचा दाखला अथवा महापालिकेच्या शासकीय मृत्यू नोंदवहीतील उतारा सादर करणे त्यासाठी आवश्यक राहणार आहे. या योजनेनुसार दरमहा एक हजार रुपये याप्रमाणे ईसीएसद्वारे लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा होतील.

मात्र, तिच्या वारसांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच विधवेच्या मृत्यूनंतर याचा लाभ मिळणार नाही. महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी महिला देखील एचआयव्ही संक्रमित असावी तसेच नियमित एसआरटी औषधोपचार घेणारी असावी, असा पुरावा सादर करणे बंधनकारक आहे.

Leave a comment

0.0/5