Skip to content Skip to footer

उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेल्या गोष्टी वाचून आपण थक्क व्हाल!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस. उद्धव ठाकरे हे सध्या देशातील दुष्काळग्रस्तांसाठी झटणारे एकमेव नेते आहेत. गेल्या १५ वर्षात सातत्याने दुष्काळी दौरे करून शेतकऱ्यांना स्वखर्चाने मदत करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ प्रश्नावर टीका न करत बसता एक आदर्श घालून दिला आहे. आज देशाच्या राजकारणात १५ वर्षे सातत्याने दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसून त्यांना मदत देणारा दुसरा नेता नाही. पाहूया त्यांनी दुष्काळग्रस्तांसाठी केलेली विविध कामं:

१) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा आहेत. आपल्या याच कलेचा सदुपयोग करत त्यांनी आपल्या छायाचित्र प्रदर्शनातून जमलेले तब्बल ५ कोटी ११ लाख रुपये हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले.

२) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेनेकडून २ कोटी रुपयांची मदत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी करण्यात आली. उद्धव ठाकरेंनी २ कोटींचा चेक मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

३) उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या विवाहाचा संपूर्ण खर्च शिवसेनेने केला. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना” उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील हजारो जोडप्यांचे विवाह शिवसेनेने मोफत लावले. एवढंच नव्हे तर त्यांना संसारोपयोगी साहित्य सुद्धा आहेर आणि रुखवत स्वरूपात देण्यात आले. शिवाय लाखो वऱ्हाड्यांच्या मोफत भोजनाची व्यवस्था शिवसेनेने केली होती.

४) शेतकरी कर्जमुक्तीसाठी २०१४ पासूनच नव्हे तर २००४ पासून सातत्याने दुष्काळी भागाचा दौरा करून सभा घेणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे, शेतकऱ्यांना कोणत्याही अपेक्षेविना मदत करणारा देशातील एकमेव राजकारणी म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव समोर येतं.

५) शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात “शिवजलक्रांती” योजना राबवण्यात आली. ज्या भागात गेली अनेक दशकं नद्या कोरड्या होत्या त्या भागात २०१६ पासून पाणी वाहतं ते यामुळेच.

६) स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागांचे दौरे करून दुष्काळग्रस्तांना धान्य, पाण्याच्या टाक्या, पाण्याचे टँकर, जनावरांना चारा आणि आर्थिक मदत केली आहे. असं करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे. शिवसेनेने दुष्काळग्रस्तांसाठी छावण्या उभ्या करून त्यांना निवारा देण्याचं काम केलं आहे.

७) उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसेना नेत्यांनी दुष्काळग्रस्तांना अनेकदा मदत म्हणून आपलं महिन्याचं वेतन देऊ केलेलं आहे.

८) दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार घेतला होता.

९) शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पिकविम्याचे पैसे न देता बँका आणि कंपन्या ते पैसे स्वतःकडे ठेवतात हे लक्षात येताच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला आणि राज्यभरात ठिकठिकाणी ५० पीक विमा मदत केंद्रांची उभारणी केली तसेच कंपन्यांविरुद्ध मोर्चाही काढला. परिणामी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे मिळण्यास सुरुवात झाली.

वाढदिवस विशेष:जे सर्वांना अशक्य वाटलं,ते उद्धव ठाकरे यांनी करून दाखवलं!

Leave a comment

0.0/5