Skip to content Skip to footer

महिलांना हात लावणाऱ्याचे हात-पाय भरचौकात छाटले पाहिजेत-आदित्य ठाकरे

“महिलांना हात लावणाऱ्याचे हात-पाय भरचौकात छाटले पाहिजेत” असं मत शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज सोलापुरात व्यक्त केलं. येथील वालचंद महाविद्यालयात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी वरील मत मांडताच उपस्थित विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.

हिंदू धर्मामध्ये गाईला माता मानलं जातं. महाराष्ट्रात गोहत्याबंदी केली आहे तरीही गायीची हत्या केली जाते. गाईची हत्या करणाऱ्याचे हात-पाय भरचौकात कापले गेले पाहिजेत असा एक कायदा केला पाहिजे असा प्रश्न एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरे यांना विचारला होता. यावर त्यांनी “गाय जेवढी महत्वाची तेवढीच माय महत्वाची आहे, महिलांना हात लावणाऱ्याचे हात-पाय भरचौकात छाटले पाहिजेत असं माझं मत आहे” असं उत्तर दिलं.

AUT

Leave a comment

0.0/5