Skip to content Skip to footer

आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांची आयुक्त परदेशी यांच्या सोबत केईएमला भेट.

आरोग्य समिती अध्यक्ष तथा नगर सेवक अमेय घोले यांच्या समवेत बृहमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त प्रवीण परदेश यांनी आज परेल येथील केईएम हॉस्पिटला भेट देऊन हॉस्पिटलची पाहणी केली आहे. आरोग्य समिती अध्यक्ष झाल्यापासून आज तागायत अध्यक्ष अमेय घोले यांनी बृहमुंबई महानगर पालिकेच्या अंतर्गत असलेल्या अनेक हॉस्पिटलचा स्थानिक आमदार आणि नगरसेवक यांच्या बरोबर दौरा करून हॉस्पिटलच्या अडचणीत जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न नगरसेवक घोले यांनी केलेला आहे.

 

 

या भेटी दरम्यान हॉस्पिटल मधील सर्व वॉर्ड वातानुकूलित करण्यात यावे, स्वछतेसाठी वॉर्डात २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, निवासी डॉक्टर यांच्या साठी प्रस्तावित मल्टिपरपोस तर्फ कोर्ट तसेच संपूर्ण रुग्णालयाचे आधुनिकरण करण्यात यावे तसेच आरएमओ होस्टेलची दुरुस्ती या विषयी सविस्तर चर्चा अध्यक्ष अमेय घोले आणि आयुक्त परदेशी यांच्यात झालेली आहे. त्यामुळे पुन्हा घोले यांच्या दूरदृष्टीमुळे केईएम हॉस्पिटचा कायापालट होणार आहे.

Leave a comment

0.0/5