Skip to content Skip to footer

आमदार सदा सरवणकर यांच्या मार्फेत बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्रात भूमिपुत्रांना नोकरीत प्रथम प्राधान्य भेटावे अशीच संकल्पना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षातर्फे वारंवार मांडण्यात आलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत उद्योग समूह आणि महाराष्ट्र शासन तथा आमदार सदा सरवणकर यांच्या पुढाकारने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन ९ ऑगस्ट रोजी सूर्यवंशी सभागृह, वीर सावरकर मार्ग, आय.एच.एम कॅटरिंग कॉलेग दादर (प) येथे भरवण्यात आलेले आहे.

 

या मेळाव्यात नामाकिंत कंपन्या सहभागी होत असू १० वी / १२ वी उत्तीर्ण -अनुत्तीर्ण / सर्व शाखांतील पदवीधर इच्छुक उमेदवारांच्या तेथेच जागेवर मुलाखती घेण्यात येणार आहे. तसेच त्याच जागी त्यांना नोकरीच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान www.balasahebthackerayrojgarmelava.com या साईडवर मोफत रजिस्टर करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. तसेच रजिस्टर करताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यातर त्यासाठी जवळच्या शिवसेना शाखेत संपर्क साधण्याचे आव्हान सुद्धा करण्यात आलेले आहे.

Leave a comment

0.0/5