Skip to content Skip to footer

मुंबईतील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देत केला शिवसेना प्रवेश

मुंबईतील काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी राजीनामा देत केला शिवसेना प्रवेश

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला होता. यानंतर त्यांनी काँग्रेस सदस्यपदाचाही राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे विठ्ठल लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. तसेच मातोश्रीवर जाऊन त्यांनी थेट शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून भगवा झेंडा हाती देत त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह लोकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या प्रवेश सोहळ्यास शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख राजेंद्र राऊत, आणि दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांची उपस्थिती होती. लोकरे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला असल्याने आता ती जागा रिक्त झालेली असून कदाचित आगामी विधानसभा निवडणुकीसोबत या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. सदर जागा शिवसेना-भाजप युती कायम राहिल्यास शिवसेना सहज जिंकू शकते. यामुळे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं संख्याबळ वाढू शकतं.

कलम ३७० हटवलं, शिवसेना भवन समोर तिरंगा आणि भगवा फडकावत शिवसेनेचा जल्लोष

Leave a comment

0.0/5