जनतेच्या समस्यांसाठी लढणारा लढवय्या….

दादर-प्रभादेवी-माहीम | The fighter who fought for the problems of the masses….

दादर-प्रभादेवी-माहीम मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार सदा सरवणकर पुन्हा एकदा २०१९ च्या निवडणुकीला निवडून यावे हिच स्थानिक जनतेची प्रमुख मागणी आहे. आज विभागातील अनेक प्रश्न सोडवण्याचे काम आमदार सदा सरवणकर यांनी केले आहे. आज विभागातील श्री साई सुंदर नगर संकुल प्रभादेवी येथील ७००० कुटुंबांना घर देण्याचे उद्दिष्ट त्यांच्या मार्फत पूर्ण करण्यात आलेले आहे.

तसेच माहीम मतदार संघात राहणाऱ्या कोळी बांधवांसाठी अनेक कामे सदा सरवणकर यांच्या फंडातून राबवण्यात आलेली आहे. शिवाजी पार्क लगत असलेल्या वीररत्न बाजीप्रभू देशपांडे (नारळी बाग) या उद्यानाचे शुशोभीकरण करण्याचे अत्यंत महत्वाचे काम आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून झालेले आहे. आज दादर-माहीम-प्रभादेवीचा विकास करण्याचे काम आमदार सरवणकर यांनी केलेले आहे.

माहीम मतदार संघात पुन्हा सरवणकरच येणार……

विभागातील सर्वच लोकप्रतिनिधी एकाच पक्षाचे असल्यामुळे नागरी सुविधांची कामे, पुर्नवसनाचे व पुर्नविकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आमदार सदा सरवणकर कार्यरत आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे तसेच खासदार राहुल शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सर्वत्र विकास कामाचा धडाका २०१४-१९ सुरु झालेला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here