काय तो माज! ट्रॅफिक पोलिसाला कारच्या बोनेटवर बसवून 2 किमी पळवलं,

बऱ्याचवेळा फाइन आणि कागदांच्या पडताळणीसाठी रस्त्यात वाहतूक पोलीस अडवतात. वाहतुकीचे नियम मोडल्यानंतरही अनेकवेळा वाहतूक पोलीस अडवल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशावेळी वाहतूक पोलिसांना न जुमानता नियम धाब्यावर बसवून सराईतपणे निघून जातात. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वात जास्त खळबळ उडाली ती दिल्ली वाहतूक पोलिसांमध्ये. हा व्हिडिओ दिल्लीचा असल्याची माहिती मिळत आहे. मात्र ह्या वाहतूक पोलिसांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

वाहतूक पोलिसांनी एका कारला अडवलं. तिथे त्या कार चालकाला कागदपत्रांची पडताळणी करण्याबाबत विचारण्यात आलं. कागदपत्र तपासली जाऊ नयेत यासाठी कार चालकानं थेट वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घातली. वाहतूक पोलीस गाडीच्या बोनेटवर पडला आरोपी चालकानं त्याला 2 किलोमीटरपर्यंत घेऊन गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीनं कार चालकानं वाहतूक पोलिसासोबत गैरवर्तन केलं आहे ते पाहा.

हा व्हिडिओ ट्विटरवर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओबाबत अनेक मतमतांतर समोर आली आहेत. काही युझर्सच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ नोव्हेंबर 2019मधील असल्याचं सांगितलं जात आहे. तर काही युझर्सनी वाहतूक पोलिसांना पैसे उकळायचे असतात म्हणून गाडी अडवली असावी अशीही एक चर्चा आहे. तर काही युझर्सच्या म्हणण्यानुसार हा व्हिडिओ समोर आला नसता तर दिल्लीतील वाहतूक पोलिसांसोबत घडणाऱ्या अशा घटना समोर आल्याच नसत्या. आरोपी चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी युझर्सनी केली आहे

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here