Skip to content Skip to footer

कोरोनाच्या संकटात खासदार श्रीकांत शिंदे यांचा मोलाचा हातभार

सध्या देशात कोरोना या संसर्ग आजाराने धुमाकूळ घातला आहे. तसेच ठण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून राज्य तसेच केंद्र सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करताना दिसून येत आहे.
लॉकडाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या कामगार वर्गाचे अतोनात हाल होताना दिसून येत आहे तसेच लॉक डाउनमूळे हातावर काम बंद पडल्याने पोट भरण्याचा सुद्धा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

यासाठी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने जवळपास १० हजाराहून अधिक कामगार कुटुंबांसाठी मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू केले आहे. घरोघरी जाऊन शिवसैनिकांच्या मदतीने सामाजिक बांधिलकी जपत त्या साहित्याचे वाटप केले जात आहे. यापूर्वी देखील पोलीस, कामगार, इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, बेघर यांना दोन वेळ जेवणाचे पाकीट खासदार शिंदे यांच्या मतदारसंघात वाटत करत आहे.

हीच तत्परता मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरात दाखवुन दिली होती. पुराच्या पाण्यात कल्याण – बदलापूर येथे महालक्ष्मी एक्सप्रेस मध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी दोन्ही पिता – पुत्राने शर्तीचे प्रयत्न करत प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले होते.

Leave a comment

0.0/5