Skip to content Skip to footer

धारावीतील घराघरांत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने स्क्रिनिंगला सुरुवात

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धारावीतील प्रत्येक नागरिकांची प्राथमिक चाचणी करण्यास मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने धारावीतील खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने घराघरांत जाऊन या चाचणी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी धारावीतील मुकुंद नगर आणि आजूबाजूच्या परिसरात स्क्रिनिंगला सुरुवात करण्यात आली.

या स्क्रिनिंग दरम्यान खासगी डॉक्टर्स आणि पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले पथक धारावीतील प्रत्येक घरात जाऊन, डिजिटल थर्मामीटरच्या साहाय्याने प्रत्येकाच्या शरीराच्या तापमानाची नोंद करत आहेत. तसेच नुकताच केलेला प्रवास (ट्रॅव्हल हिस्टरी) आणि इतर गोष्टीबाबत विचारपूस करून नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. या स्क्रिनिंग दरम्यान संशयास्पद (ज्यांना कोरोना किंवा संबंधित लक्षणे जाणवताहेत) नागरिकांची माहिती त्वरित पालिकेला देऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. या चाचणीत बाधित आढळणाऱ्या नागरिकांना गरजेनुसार अलगीकरण, विलगिकरण कक्षात ठेवण्यात येईल व रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

धारावीतील घराघरांत खासदा-Especially in homes in Dharavi

खासदार राहुल शेवाळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, इंडियन मेडिकल कौन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या मार्फत धारावीतील खासगी डॉक्टरांनी पालिका प्रशासनाच्या मोहिमेत सहभागी होण्याची तयारी दाखविली. त्यानुसार सुमारे १५० खासगी डॉक्टर्स व पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने येत्या १०-१२ दिवसांत संपूर्ण धारावीचे स्क्रिनिंग करणार आहेत.

Leave a comment

0.0/5