रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार ! – मुंबई मनपाची माहिती

रोगप्रतिकारक शक्ती वाढव-Increase the immune system

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार ! – मुंबई मनपाची माहिती

सध्या राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यातच अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसुन येत आहे व आता वरळी, लोअर परेल, धारावी, दादर ही ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेतर्फे घरोघरी जाऊन चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता वरळी आणि धारावी भागातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर पेडणेकर यांनी दिली आहे.

वरळी आणि धारावी परीसरातील नागरिकांना मुंबई मनपा हायड्रोक्लोरोक्वीनचा डोस देणार आहे. वय वर्ष 18 ते 55 वयोगटातील निरोगी नागरिकांना हा डोस दिला जाणार आहे,” असेही महापौर म्हणाल्या.
ज्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यासारखे आजार नाहीत, त्यांना या गोळ्या दिल्या जाणार आहेत. या दाट लोकसंख्येच्या भागातील गर्दी आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून हे औषध दिले जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here