माणुसकीचा धर्म पाळणाऱ्या रिक्षा चालकाचे मंत्री आदित्य ठाकरेंनी मानले आभार
कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशात पुन्हा 3 मे पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे प्रवासी वाहतुकीला सुद्धा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहे. मात्र डोंबिवली मधील एक रिक्षाचालक अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना तसेच रुग्णांना मोफत सेवा देत आहे आणि याची माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांना पडताच त्यांनी न विसरता या रिक्षाचालकाचे आभार मानले आहे.
डोंबिवली मधील एक माणुसकी धर्म पाळणारे रुपेश जी, यांच्या सोबत देखील आज संपर्क साधला. परवा मी ट्विटरच्या माध्यमातून पाहिले होते की ते आपल्या रिक्षामधून डॉक्टर्स, पोलिस आणि रुग्णांना निःशुल्क सेवा पुरवतात. त्यांचे आभार मानले. हीच ताकद आपल्याला ह्या व्हायरसला हरवण्यात उपयोगी येत आहे.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 15, 2020
विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांना या बाबतची माहिती मिळाली. त्यांनी या रिक्षाचालकाचे आभार व्यक्त करण्यासाठी युवासेना सचिव वरून सरदेसाई यांना शोधण्याचे आदेश दिले आणि लागलीच शिवसैनिकांनी त्या रिक्षाचालकाला शोधून काढले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे रिक्षाचालकाला मास्क आणि सॅनिटायझर देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. याची माहिती ट्विट करत मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे.