धारावीत कोरोनाचा वेग मंदावला

धारावीत कोरोनाचा वेग -Velocity of corona in Dharavi

धारावीत कोरोनाचा वेग मंदावल

मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या धारावीतून दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसापासून धारावीत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत होती. ही होत असलेली वाढ आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि मुंबई महानगर पालिका शर्थीचे प्रयत्न करत होते. मात्र आता धारावीत कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याची बातमी समोर येत आहे. गुरूवारी धारावीत 25 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते.

मात्र शुक्रवारी फक्त 6 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. धारावीतल्या प्रत्येक घरोघरी जाऊन प्रशासन लोकांचं स्क्रीनिंग करत होतं. प्रशासनाला दाट लोकसंख्या आणि अतिशय कमी जागा हे दुहेरी आव्हान पेलावं लागत होते. मात्र आता कोरोना फैलावाच्या वेग कमी करण्यात प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आलं आहे. दरम्यान, धारावीत 6 कोरोनाग्रस्त रुग्ण वाढल्याने रुग्णांची संख्या 220 वर जाऊन पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत धारावीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here