Skip to content Skip to footer

संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्य मंत्री

संस्थात्मक क्वारंटाईनसाठी आक्रमकपणे पावले उचलणार – आरोग्य मंत्री

मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून, त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन मध्ये जाणार नाहीत आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यांचा रेड झोनकडे प्रवास होणार नाही यासाठी कंटेंटमेंट झोन मधील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज आरोग्यमंत्री टोपे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सवांद साधला होता. केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईमध्ये दाट लोकवस्तीतील पॉझिटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या असून, आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Leave a comment

0.0/5