मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे बाळाला मिळाले पोलिओ डोस

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या-Minister Aditya Thackeray

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे बाळाला मिळाले पोलिओ डोस

सध्या देशात कोरोनाच्या संसर्ग आजराने हाहाकार माजवला आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे संपुर्ण देशात बंद सदृश परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे. या लॉकडाऊनमुळे मनपा दवाखान्यात लहान बालकांचे लसीकरण केंद्र देखील बंद पडले आहे. या बंद पडलेल्या लसीकरण विभागामुळे आपल्या मुलाला पोलिओ डोस कसा मिळेल या चिंतेने ग्रस्त असलेल्या महिलेने मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मदत मागितली.

प्रभादेवी वरळी येथे पुण्याहून मुंबईत बाळंतपणासाठी आलेल्या पूर्वा भोसले यांनी आपल्या 4 महिन्याच्या बालकाला पोलिओ डोस द्यायचा होता. बाहेरही जाता येत नसल्यामुळे त्यांनी आपली खंत ट्विटरच्या माध्यमातून मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यंत पोहचवली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी सर्वोतोपरी मदत करण्याचे त्या मातेला आश्वासन दिले व संबंधित खात्याला तसे निर्देश दिले. युवासेनेचे सिद्धेश कदम यांनी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्याशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. तात्काळ अमेय घोले यांनी खाजगी डॉक्टरशी सवांद साधत अखेर त्या बाळाला खाजगी डॉक्टरांच्या साहाय्याने पोलिओ डोस देण्यात आला. त्यानंतर सदर महिलेने मंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार देखील मानले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here