दिल्लीत मराठी माणसाच्या मदतीला धावून आले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

दिल्लीत मराठी माणसाच्या-Of a Marathi man in Delhi

दिल्लीत मराठी माणसाच्या मदतीला धावून आले खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

हरीद्वारला गेलेल मराठी कुटुंब लॉकडाऊनमुळे तेथेच अडकले होते. त्यानंतर कसेबसे ते दीड महिन्यानंतर दिल्लीत पोहचले. मात्र, दिल्लीहून मुंबईत येण्यासाठीचे तिकीट दुस-या दिवशीचे असल्याने दिल्लीत रात्रभर राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. लॉकडाऊनमुळे हॉटेल्स, लॉज वगैरे सर्वच बंद असल्याने त्यांनी दिल्लीतील महाराष्ट्र मंडळाकडे धाव घेतली. परंतू, लॉकडाऊनच्या काळातही महाराष्ट्र भवन लोकांच्या सोयीसाठी सुरू राहायला हवे होते मात्र ते देखील शासनाच्या आदेशाने बंद असल्याचे तेथील व्यवस्थापकाने सांगितले.

झी 24 तास या वृत्तवाहिनीने या कुटुंबाची वणवण होत असताना मराठी संस्थाच मराठी माणसांच्या उपयोगी पडत नसल्याचे वृत्त दिले. त्यानंतर आमदार तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे पूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्या कुटुंबाला मदत केली व त्यांच्या राहण्याची व्यवस्था दिल्ली येथे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here