मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन!

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्श-Under the guidance of Minister Eknath Shinde

मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन!

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ.श्रीकांत शिंदें व जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर शहर प्रमुख सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहाड गांवठाण (कोळीवाडा) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील शिवसेना शाखा प्रमुख केशव ओवळेकर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पडले. यात एकूण ७६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने नियमित रक्तदान शिबीरांचे आयोजन बंद झाले आहे. त्यामुळे सध्या राज्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. भविष्यातही रक्ताची गरज पडणार आहे. ही गरज ओळखून या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिवसेना शहाड गावठाण, डी. बी. जाधव स्पोर्ट्स अकॅडमी, सोहम फाऊंडेशन तसेच माँ फाऊंडेशन यांच्या तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला शिवसेना शाखा शहाड गावठाण परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अर्पण ब्लँड बँक कल्याण यांच्या सहकार्याने आजचे शिबीर पार पडले. या शिबिरासाठी शहरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, युवासेना शहर अधिकारी शबाळा श्रीखंडे, उपशहर प्रमुख राजेंद्र साहू, उपविभाग प्रमुख विनोद साळेकर, प्रमोद पांडे, शाखाप्रमुख सुरेश पाटील, शैलेश हिगमीर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here