चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी निसर्ग हेल्पलाईन सुरू !

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या-Hurricane hit

चक्रीवादळाचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी निसर्ग हेल्पलाईन सुरू !

कोरोनाच्या संकट सुरु असतानाच कोकणात किनारपट्टीच्या भागावर निसर्ग चक्रीवादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. दोनच दिवसापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गावांना भेटी देऊन तात्काळ मदत जाहीर केली होती. याच पार्श्वभूमीवर कोकण पुन्हा उभं करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी विशेष तरतुदी केल्या आहेत.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत ३९७.९७ कोटीची कामे किनारपट्टीवरील जिल्ह्यामध्ये सुरु करण्यात आली आहेत. तसेच चक्रीवादळाचा फटका बसलेल्या लोकांसाठी शासनाने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केलेली आहे.

या हेल्पलाईनद्वारे निसर्गाचा तडाखा बसलेल्या नुकसानग्रस्त नागरिकांसाठी सरकारने हेल्पलाईन दोन नंबर जाहीर केले आहे. १८००-२२-८५९५, ०२२- २४३९८३५६ या क्रमांकावर निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या नागरिकांनी सकाळी ११ ते ६ या वेळेत संपर्क करून आपल्या वैयक्तिक परिस्तिथीचा आणि नुकसानाचा आढावा द्यावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here