मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी धावणार ट्रेन….!

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी-For essential services in Mumbai

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी धावणार ट्रेन….!

कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे जवळपास अडीच महिने बंद असलेली मुंबईची लाइफ लाईन पुन्हा एकदा अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादित स्वरूपात चालू करण्यात येणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास करता येईल. रेल्वे विभागाकडून रविवारी रात्री उशीरा यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर १५ तारखेपासून लोकल ट्रेन सोडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबईतील लोकल सुरु करावी याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर लोकल सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी डब्ल्यूआर, सीआर (मेन लाइन आणि हार्बर लाइन) वर निवडलेल्या उपनगरी सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेल्वे सेवा सुरू करून मुंबईत येणाऱ्या दिवसात कोरोनाचा धोका अधिक वाढला जाऊ शकतो हे सुद्धा नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here