मुंबईत चक्क टॅक्सी वरून मृतदेह स्मशानात दाखल….!

मुंबईत चक्क टॅक्सी वरून म-In Mumbai, I took a taxi

मुंबईत चक्क टॅक्सी वरून मृतदेह स्मशानात दाखल….!

(साभार मॅक्स महाराष्ट्र)

सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. याचा परिणाम पूर्णपणे वैद्यकीय बाबींशी निगडित असलेल्या गोष्टीवर सुद्धा पडलेला दिसून येत आहे. एकीकडे आधीच मुंबईतील खाजगी डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीने आपापले दवाखाने बंद ठेवले आहेत आणि दुसरीकडे ही वाढती रुग्ण संख्या चिंतेचं कारण ठरत आहे. आज कोरोनाच्या संसर्गाने अनेकांचे प्राण जात असून, मुंबईमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे मात्र सर्वसामान्य नागरिकांचे हाल होताना दिसत आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे राहणाऱ्या हवालदार सिंह यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने त्यांनी तो मृतदेह टॅक्सीच्या टपावर ठेवून स्मशानभूमीत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी घडली होती. याबाबत सिंह यांनी प्रतिक्रिया दिली असता ते म्हणाले की, मृतदेह नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिकेला फोन केला, तर तेव्हा रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. तर दुसरीकडे खाजगी रुग्णवाहिका अवघ्या २ किलोमीटर जाण्यासाठी २००० ते ३००० रुपये मागत होती. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here