माटुंग्याच्या इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या परीक्षा रद्द करा युवासेनेची मागणी !

माटुंग्याच्या इन्स्टिटयूट ऑफ केमि-Matunga Institute of Chemistry

माटुंग्याच्या इन्स्टिटयूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या परीक्षा रद्द करा युवासेनेची मागणी !

कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यापीठाच्या पदवी आणि पद्युत्तर विद्यापीठाच्या परीक्षा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रद्द करण्याचे आदेश दिले आहे. मात्र माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही संस्थेने विद्यार्थ्यांची दिशाभूल करत ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ती ऑनलाइन परीक्षा तातडीने रद्द करावी, अशी मागणी युवासेना तर्फे करण्यात आलेली आहे.

युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शना नुसार युवासेना सचिव वरून सरदेसाई आणि कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना निवदेन दिले. ऑनलाईन परीक्षा तातडीने रद्द कराव्यात असे आदेश आयसीटीच्या कुलगुरूंना द्यावेत, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here