महापौर किशोरी पेडणेकर यांची सायन हॉस्पिटला अचानक भेट…

महापौर किशोरी पेडणेकर य-Mayor Kishori Pednekar

महापौर किशोरी पेडणेकर यांची सायन हॉस्पिटला अचानक भेट…

अनेक दिवस विरोधकांकडून लोकमान्य टिळक रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटल मधील कोरोना रुग्णांच्याबाबतीत हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत होत्या. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या समवेत सायन रुग्णालयाला भेट दिली. तसेच यावेळी त्यांनी कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी सायन रुग्णालयाच्या पाहणीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामांचे कौतुक करत त्यांचे मनोधैर्य वाढवले. “आम्ही आज सायन रुग्णालयातील कोविड वॉर्ड्सची पाहणी केली. कोविड वॉर्डमध्ये रुग्णांची असुविधा होत असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यांचा दावा खरा आहे का? याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सायन रुग्णालयाला अचानक भेट दिली”, असं किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

#माझा_महापालिका #माझा_अभिमानसौ. किशोरी किशोर पेडणेकर ,महापौर यांनी लोकमान्य टिळक(सायन) हॉस्पिटल, सायन येथे कोविड वॉर्ड ६,७ व ८ ला भेट दिली सोबत आरोग्य समिती अध्यक्ष श्री अमेय घोलेअत्यंत जबाबदारी ने रुग्णांना मिळत असलेल्या सेवा व उपचार याबाबत विचारपूस केली

Posted by सौ किशोरी किशोर पेडणेकर on Friday, 10 July 2020

यावेळी पेडणेकर आणि अमेय घोले यांनी स्वतः पीपीई किट परिधान केले होते. यावर बोलताना पेडणेकर म्हणाल्या की,”आज मी पीपीई किट वापरल्यावर समजलं की किती अवघड काम आहे. आपण आपले नाक, डोळे, कान कुठेही हात लावू शकत नाही”, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here