इच्छाशक्ती पुढे कोरोनाला पण नमवलं ; १०० वर्षांचे आजोबा कोरोनमुक्त !

इच्छाशक्ती पुढे कोरोनाला -Willpower forward to Corona

करोनाची बाधा झाल्यामुळे जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयामध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नागरिक अर्जुन गोविंद नरिंग्रेकर यांनी मंगळवारी करोनावर मात केली. करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना १ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे बुधवार, १५ जुलै रोजी नरिंग्रेकर यांनी वयाची १०० वर्षे पूर्ण केली आहेत. रुग्णालयातून त्यांना मंगळवारी घरी पाठविण्यात आले. डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात त्यांचा १०१वा वाढदिवस साजरा केला आणि त्यांना घरी पाठविण्यात आले. अर्जुन नारिंग्रेकर मूळचे देवगड तालुक्यातील नारिंग्रे गावचे रहिवासी असून मिठबाव, दहिबाव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे आदी गावांतील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here