शिवसैनिक नितीन नांदगावकर सेना भवनात कोरोनाच्या तक्रारी बाबत घेणार सामान्यांची भेट…

शिवसैनिक नितीन नांदगावकर -Shiv Sainik Nitin Nandgaonkar

शिवसैनिक नितीन नांदगावकर सेना भवनात कोरोनाच्या तक्रारी बाबत घेणार सामान्यांची भेट…

कोरोनाच्या वाढत्या संकटात प्रायव्हेट हॉस्पिटलची पायरी चढणाऱ्या सामान्य नागरिकांना लुटणाच्या व्यवसायात या हॉस्पिटलच्या व्यवस्थपकांनी सुरु केला होता. या लुटमारीला चाप बसण्यासाठी शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी या हॉस्पिटल व्यवस्थापकांच्या विरोधात बंड पुकारले आहे.

पैशांअभावी कोरोना रुग्णांचे सुरु असलेले हाल त्यात बिला-पायी कर्जबाजारी होत असलेला सामान्य नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचे अवाढव्य बिल कमी करून देण्यासाठी अनेक प्रायव्हेट हॉस्पिटला दौरा नांदगावकर यांनी केला होता. तसेच त्यांना जागेवर न्याय सुद्धा मिळून दिला होता.

आज वाढत असलेल्या हॉस्पिटलच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी येत्या दर बुधवारी आणि गुरुवारी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत शिवसेना भवन दादर येथे नितीन नांदगावकर उपलब्ध असणार आहे. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिलेली आहे. फक्त कोरोना संदर्भात असलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या जाणार आहे, असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

त्यांनी आपल्या फेसबुकच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले आहे की, कोरोना संदर्भात हॉस्पिटल विरोधात असलेल्या तक्रारी पुराव्यानिशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नवे अर्ज करून तुमचे पुरावे त्याला जोडून हा अर्ज शिवसेना भवन येथे जमा करावयास आहे. त्या नंतर सदर कागदपत्रांची शहनिशा करून हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही नांदगावकर यांनी दिलेली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here