अभिनेता आदेश बांदेकर यांची पुन्हा एकदा सिद्धिविनायक मंदिर न्यायाच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

अभिनेता आदेश बांदेकर यां-Actor Aadesh Bandekar

अभिनेता आदेश बांदेकर यांची पुन्हा एकदा सिद्धिविनायक मंदिर न्यायाच्या अध्यक्षपदी नियुक्ती..

अभिनेता तथा शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची पुन्हा एकदा प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. यापूर्वी २०१७ पूर्वी त्यांनी अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला होता. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश बांदेकर यांचे नाव सुचविले होते.

आदेश बांदेकर सर्वप्रथम २०१७ रोजी या सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष बनले होते. पुढील तीन वर्षासाठी म्हणजे २४ जुलै २०२२ पर्यंत यांच्याकडे अध्यक्षपदाचा कारभार राहणार आहे. आज पुन्हा नव्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे कुठल्याही संस्था आणि संघटनेच्या निवडणूक होत नाहीत. त्यामुळे आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे. दरम्यान ‘ज्या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी उभा राहायचो त्या मंदिराचा अध्यक्ष मला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे’, असे त्यांनी पहिल्या निवड झाल्यानंतर म्हटले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here