Skip to content Skip to footer

मुंबई महानगरपालिकेचे ‘मिशन धारावी’ची ऑस्ट्रेलियाच्या सरकारी न्यूज चॅनेलने घेतली दखल…!

मुंबई महानगरपालिकेचे ‘मिशन धारावी’ची ऑस्ट्रेलियाच्या सरकारी न्यूज चॅनेलने घेतली दखल…!

दाटीवाटीची वस्ती, अरुंद रस्ते, मोठ्या लोकसंख्याचे प्रमाण या सर्व घटकांमुळे धारावी झोपडपट्टीमध्ये कोरोना संसर्गाचा शिरकाव होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होईल असेच सर्वांना वाटत होते. मात्र मुंबई महानगर पालिकेने तातडीने राबविलेल्या उपाय-योजनांमुळे तसेच कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी मनपाने घेतलेल्या खबरदारीमुळे आता धारावीमध्ये केवळ दोन आकड्याची कोरोना रुग्णसंख्या उरलेली आहे.

आज बृहमुंबई महानगर पालिकेने धारावीमध्ये कोरोना रुग्ण संख्या रोखण्यासाठी केलेल्या उपाय-योजनांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेली होती. त्या पाठोपाठ आता ऑस्ट्रेलियाच्या सरकारी न्युज चॅनेलने सुद्धा ‘धारावी पॅटर्न’चे कौतुक केले आहे. त्यामुळे धारावी पॅटर्नचा डंका आता जगभरात वाजताना दिसून येत आहे.

आज देशभरातील इतर भागात कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात होत आहे. लोकांच्या मनात प्रचंड प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी धारावी पॅटर्न देशाला नवी दिशा दाखवण्याचे काम करत आहे.

Leave a comment

0.0/5