मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी सात तास मॅनहोल जवळ उभ्या राहिल्या…..!

मुंबईकरांच्या सुरक्षिते-Safety of Mumbaikars

मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी सात तास मॅनहोल जवळ उभ्या राहिल्या…..!

मागील तीन-चार दिवसापूर्वी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याची घटना घडली होती. मात्र या धो-धो पडणाऱ्या पावसात आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी उघडल्यावर असलेल्या मॅनहोल पासून लोकांना सुरक्षित ठेवण्यातही सदर महिला ७ तास पाण्यात विना छत्रीची उभी राहिली होती.

कांता कलन असे सदर महिलेने नाव असून, मागील अनेक वर्षपासून माटुंगा येथे फुलांचा व्यवसाय त्या करतात आणि माटुंगा स्थानकाबाहेर त्या वास्तव्य करतात. मुंबईत धो-धो पाऊस पडत असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या सर्व प्रकरणात स्वतः पाण्यात उतरून त्यांनी मॅनहोलचे झाकण काढले आणि स्वतः इतरांना इजा होऊ नये म्हणून तिथेच सात तास उभ्या राहिल्या.

सात तास पाण्यात उभे राहिल्यामुळे त्यांना ताप सुद्धा आला होता. तसेच मनपाच्या कर्मचाऱ्यांचा ओरडा सुद्धा खावा लागला होता. मात्र पाण्याची पातळी सतत वाढत होती. त्याचमुळे हे पाऊले आपण उचलले असल्याचे कांता यांनी मनपा कर्मचाऱ्यांना सांगितले. या घटनेचा एक विडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here