Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसवर सुरक्षा रक्षकाला शिव्या देणारा इसम निघाला आर. रिपब्लिकन वृत्तसमूहाचा पत्रकार !!

मुख्यमंत्र्यांच्या फार्महाऊसवर सुरक्षा रक्षकाला शिव्या देणारा इसम निघाला आर. रिपब्लिकन वृत्तसमूहाचा पत्रकार !!

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्म हाऊसमध्ये
संशयास्पद प्रवेश करणाऱ्या तसेच जबरदस्ती विचारपूस केल्याप्रकरणी खालापूर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. त्यात अटक केलेल्या पत्रकारांची नावे अनुज शर्मा व यशपालजीत सिंग असे असून, ते आर. रिपब्लिकन या वृत्तसमूहाचे पत्रकार असल्याचे समोर येत आहे. तर तिसऱ्या व्यक्तीचे नाव प्रदीप असून तो पेशाने ओला ड्राइवर असल्याची माहिती समोर येत आहे.

मंगळवारी रात्री पोलिसांनी या तिघांना अटक केली असून, कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या संदर्भात रायगड पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, मुख्यमंत्र्यांच्या रायगड येथील फार्महाऊसवर तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आलेली आहे.

हे तिघेजण मंगळवारी रात्री फार्म हाऊसच्या गार्डला पत्ता विचारत होते. परंतु गार्डने त्यांना माहिती न दिल्याने त्यांनी त्याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. पोलीसांनी त्यांच्यावर जबरदस्ती घरात घुसणे, शिविगाळ करणे, धमकी देणे असे आरोप लावून पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5