नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३० वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे राहते.
प्रेयसीची आक्षेपार्ह चित्रफितीच्या आधारे समाज माध्यमावर बदनामी करण्याचे एक प्रकरण नालासोपारा येथे उघडकीस आले आहे. आरोपी तरुणाने टिकटिक या अॅपवर महिलेच्या आक्षेपार्ह चित्रफिती प्रसारित केल्या तसेच या महिलेचे बनावट फेसबुक खाते बनवून त्यावरही आपत्तीजनक फोटो प्रसारित केले होते.
नालासोपारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ३० वर्षांची असून ती नालासोपारा पश्चिम येथे राहते. तिचे याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दरम्यान, आरोपीने तिची समाजमाध्यमांवर बदनामी करण्यास सुरुवात केली. त्याने महिलेच्या खासगी छायाचित्रांची चित्रफीत तयार करून ती ‘टिकटॉक’ अॅपवर प्रसारित केली.
तसेच या महिलेचे बनावट फेसबुक खाते उघडून त्यावरही दोघांचे आक्षेपार्ह छायाचित्रे पोस्ट केली. ही सर्व छायाचित्रे आणि चित्रफिती त्याने पीडित महिलेच्या कुटुंबीयांना पाठवून तिची बदनामी केली. व्हॉट्सअॅपवरही आरोपीने बदनामी केली.
याबाबत पीडितेने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून गुन्हाची कारणे तपास असल्याची माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली.
आम्ही तपास करत असून त्याने हे कृत्य का केले तसेच कशा प्रकारे बदनामी केली त्याचा शोध घेत आहोत.
– गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक नालासोपारा पोलीस ठाणे