‘शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही’ ; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे.
अंबरनाथ व बदलापूर स्थानकादरम्यान नव्याने उभारल्या जाणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाच्या जागेसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाली. या कामासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा केला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे हे स्थानक लवकरच उभारले जाणार आहे.
स्थानकाच्या जागेसाठी जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरू झाली असून, या भागातील शेतकऱ्यांना अनेक समस्या व प्रश्न याबाबतीत पडले होते. त्या पार्श्वभूमीवर चिखलोली परिसरातील शेतकरी बांधवांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन त्यांना असलेल्या समस्या मांडल्या.
सर्व समस्या समजावून घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंनी शेतकऱ्यांवर जमीन अधिग्रहण प्रक्रियेत कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. या भेटी दरम्यान शेतकरी बांधवांनी या निर्माण कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले. तसेच हे विकास कार्य करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शेतकऱ्यांनी खासदार शिंदे यांचे कौतुकही केले.