दापोली येथे १०० खाटांच्या रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी आमदार योगेश कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

दापोली-येथे-१००-खाटांच्य-100 beds at Dapoli

दापोली येथे १०० खाटांच्या रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी आमदार योगेश कदम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

दापोली तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे १०० खाटांचे रुग्णालय मंजूर व्हावे, अशी मागणी दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या निवेदनात कदम म्हणतात की, दापोली हा भौगोलिक दृष्टया अतिशय दुर्गम भाग आहे. इथल्या रुग्णांना उपचारासाठी रत्नागिरी, पुणे किंवा मुंबई येथे जावे लागत आहे.

यात आरोग्याच्या गंभीर तक्रारी असलेल्या रुग्णांना मोठ्या शहरात उपचारासाठी नेण्यात वेळ आणि पैसा खर्चिक होतो. याशिवाय लांबच्या प्रवासामुळे वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाल्यास रुग्णांच्या जीवावर बेतते. त्यामुळे सुसज्ज रुग्णालय मंजूर करून नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ही योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here