Skip to content Skip to footer

लोकल मध्ये वाढत असलेली गर्दी देत आहे कोरोनाला निमंत्रण !

लोकल मध्ये वाढत असलेली गर्दी देत आहे कोरोनाला निमंत्रण !

कोरोनाच्या संसर्गाला थोपवण्यासाठी सरकारने मागील सहा महिन्यापासून लोकल सेवा बंद ठेवलेली आहे. फक्त अत्यावश सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी लोकल सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र आज अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाढत्या गर्दीमुळे पुन्हा एकदा संसर्गाचा धोका निर्मण झालेला आहे.

याच मुद्द्यावर आता लोकल सेवेच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सर्व स्तरातून होताना दिसून येत आहे. सुरूवातीला प्रवासातही सुरक्षित अंतर ठेऊन प्रवास केला जात होता. मात्र आज लोकल मध्ये वाढत असलेली गर्दी त्यामुळे अंतर ठेऊन प्रवास कारणे अशक्य आहेत.

सध्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी मर्यादित डबे उपलब्ध आहेत. या डब्यात महिलांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे आता प्रवास करताना उभे राहण्यासाठी महिलांना कसरत करावी लागत आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करतो असे सांगून काही जण बनावट ओळखपत्र तयार करून घेत आहेत. असे प्रवासी सध्या उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये घुसत आहेत. अशा प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. वसई रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाचशे रुपयांत असे बनावट ओळखपत्र तयार करून मिळते. त्यानुसार तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरा रोडमध्ये एका महिलेवर आणि अंधेरी येथे एका व्यक्तीवर अशा प्रकारे कारवाई करण्यात आल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

Leave a comment

0.0/5