हाथसार प्रकरणी शिवसेनेचं चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन
हाथसार येथे दलित अल्पवयीन मुलीवर तेथील स्थानिक सवर्ण समाजाच्या इसमांनी बलात्कार करून तिच्यावर अमानवी कृत्य केले होते. या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण पसरले होते. त्यातच सदर मुलीचा मृतदेह संशयास्पद तिच्या राहत्या गावात आणून तिच्यावर कुटुंबीयाचा विरोध डावलून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याविरोधात शिवसेना पक्षाने काल चर्चगेट स्थानकावर उत्तरप्रदेश सरकार विरोधात आंदोलन केले.
शिवसेनेच्या आंदोलनात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचाही सहभाग होता. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या सगळ्या घटनेचे पडसाद बुधवार, गुरुवार असे दोन दिवस देशभरातल्या विविध ठिकाणी उमटले.
हाथरस या ठिकाणी गुरुवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांना अडवण्यात आलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचाही आरोप राहुल गांधी यांनी केला. रात्री उशिरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात महामारी अॅक्टनुसार गुन्हाही दाखल करण्यात आला.
यावर भाष्य करताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. जसे विकास दुबेला मारलं, की कोणत्याही परिस्थितीत सत्य बाहेर येऊ नये त्याच परिस्थितीत काळ्या अंधारात पीडितेच्या मृतदेहावर अंतसंस्कार करण्यात आले. पुढे बोलताना खासदार सावंत म्हणाले की, हीच लोक जेव्हा आमच्या पालघरला जेव्हा साधूंच प्रकरण झालं तेव्हा लगेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करत होते. कुठे गेले त्या टिनपाट साऱ्या नट्या, Y+ सुरक्षा घेणारे कुठे आहेत, कोण देणार गरिबांना सुरक्षा असे म्हणत कंगना रानौत आणि तिच्या समर्थांत उतरलेल्या भाजपा नेत्यांना सावंत यांनी टोला लगावला होता.