सुशांतची हत्या नाही आत्महत्या एम्सच्या डॉक्टरांचा अहवाल !
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी एम्स हॉस्पिटलने आपला अहवाल सीबीआयकडे सुपूर्द केला आहे. या रिपोर्ट नुसार सुशांतच्या हत्येचा दावा पूर्णपणे एम्सच्या डॉक्टरांनी फेटाळला असून, सुशांतची हत्या नाही तर आत्महत्या केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितले आहे.
एम्सच्या डॉक्टरांनी सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली असावी याला पूर्णपणे नकार दिला आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी आणि त्याच्या वकिलांनी सुशांतला आधी विष देऊन मारले आणि नंतर गळफास देण्यात आला असा आरोप केला होता. मात्र एम्सच्या डॉक्टरांनी या प्रकरणाचा तपास केला असताना सुशांतच्या गळ्यावर असलेले गळफासाचे मार्क आणि शवविच्छेदनात स्पष्ट करण्यात आलेली मृत्यूची वेळ व इतर तथ्यांनुसार, सुशांतची हत्या झाली असावी असे म्हणता येणार नाही, असे डॉक्टरांच्या टीमने स्पष्ट केले आहे.
दरम्यान १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेतला होता. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी केला होता. मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या केली, असं स्पष्ट केले होते. परंतु, सुशांतने आत्महत्या केली नसून हत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. अखेर हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला आणि सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाच्या तपासाला सीबीआयने सुरुवात केली आहे .