बेस्ट अध्यक्ष पदावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला !!
आज झालेल्या बेस्ट अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचे प्रवीण शिंदे विजय झाले आहेत. काँग्रेस उमेदवार, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी एनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यमुळे शिंदे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
या निवणुडकीत शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांना ८ मते तर भाजपाचे प्रकार गंगाधरे यांना ५ मते मिळाली. शिवसेना ८, भाजपा ६, काँग्रेस २, राष्ट्रवादी १ अशा एकूण १७ सदस्यांपैकी शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांना ८ तर भाजपाचे प्रकाश गंगाधरे यांना ५ मते मिळाली त्यातील २ मते अवैद्य ठरली होती.
या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवी राजा यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यमुळे आणि ऐनवेळी काँग्रेस तटस्थ राहिल्यामुळे शिवसेनेचा विजयाचा मार्ग मोकळा आला होता. तर भाजपाने काँग्रेसला पाठिंबा देऊन सेनेच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला होता.