आरेचा लढा यशस्वी करण्यासाठी, अमित ठाकरेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला होता. यावेळी त्यांनी प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करत असल्याची घोषणा केली होती. या संदर्भात अमित ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारचे आभार मानले आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, ‘आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम! सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार.’
मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येईल अशी माहिती रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली होती. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले होते. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरि