आज पासून पुन्हा शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेत रुजू..!

आज-पासून-पुन्हा-शिवशाही-ब-From-today-again-Shivshahi-b

आज पासून पुन्हा शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेत रुजू..!

कल्याण, ठाणे ते मंत्रालय मार्गावर बसने प्रवास करणाऱ्या कर्मचारी वर्गाची गर्दी पाहता आजपासून वातानुकुलित शिवशाही बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. गर्दीच्या वेळी या शिवशाहीतून सरकारी, खासगी कार्यालयीन बरोबरच सर्व सामान्य नागरिकांना सुद्धा प्रवास करता येणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामन्य नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.

सध्या अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आलेली आहे. तर खाजगी कर्मचाऱ्यांना तसेच अन्य प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबई मनपा, परिवहन सेवा यांच्यावर मोठा ताण पडताना दिसत आहे. त्यामुळेच एसटी महामंडळाने फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

त्यातच आता महामंडळाने प्रथमच वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली, ठाणे येथून मंत्रालयपर्यंत वातानुकूलित शिवशाही बससेवेची सुरुवात केली. सध्या २३ शिवशाही बस धावत असतानाच आता आणखी सहा शिवशाही बसचा समावेश केला जात आहे. यात कल्याण ते मंत्रालय ते कल्याण या नविन मार्गावर चार, तर ठाणे ते मंत्रालय या मार्गावर आणखी दोन शिवशाही १२ ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here