Skip to content Skip to footer

नवी मुंबईत नाराज भाजपा नगरसेवकांचा गट शिवसेनेच्या भेटीला


नवी मुंबईत नाराज भाजपा नगरसेवकांचा गट शिवसेनेच्या भेटीला

नवी मुंबईतील काही भाजपा आजी-माजी नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या भेटीला पोहोचल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपाच्या काही माजी नगरसेवकांची कामे भाजपचे नेते अडवत असल्यामुळे नाराज असलेल्या माजी नगरसेवकांनी शिवसेना नेत्याची भेट घेतलेली आहे. त्यात शिवसेना नेत्यांनी सुद्धा त्यांच्या प्रभागातील कामे झटक्यात करून दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

त्यात नवी मुंबईच्या अघोषित युतीमुळे नव्या चर्चेला उधाण आले आहे. यापूर्वीच नवीमुंबईमध्ये भाजपाचा एक गट नाराज असल्याचे बोलले जात होते. त्याच्या प्रभागातील कामे सत्ता असताना देखील होत नव्हती. फक्त मर्जीतल्या नगरसेवकांचीच कामे होत असल्याने नाराज नगरसेवक अस्वस्थ होते. याबाबत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार देऊन सुद्धा यावर तोडगा निघालेला नव्हता. मात्र या ताज्या घटनेनंतर सुद्धा परिस्थिती सुधारत नसल्याचे चित्र दिसून आल्यानंतर निवडणुकांमधून निवडून कसं यायचं असा प्रश्न हे नाराज नगरसेवक व्यक्त करत आहेत.

आता नवी मुंबईच्या महापालिकेत प्रशासकाची नियुक्ती असल्याने याचीच संधी साधत या नगरसेवकांनी थेट शिवसेना नेत्यांच्या दरबारीच हजेरी लावली आणि आपल्या प्रभागातील कामे करून घेतली. या कामांमधून नाराज नगरसेवकांचा फायदा झालाच पण शिवसेनेच्या नेत्यांनी ही या कामांमधून आपलं ही चांगलंच चांगभलं करून घेतलं असल्याची चर्चाही रंगली आहे. मात्र, या नाराज नगरसेवकांची नाराजी आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

Leave a comment

0.0/5