Skip to content Skip to footer

सर्व महिलांना आता लोकलने प्रवास करता येणार, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

सर्व महिलांना आता लोकलने प्रवास करता येणार, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची घोषणा

महिलांना लोकलने प्रवास करू द्यावा यासाठी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले होते. राज्य सरकारने शुक्रवारी सरसकट सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची संमती दिली होती. मात्र रेल्वे प्रशासनाने या संदर्भातील परवानगी नाकारली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारने महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करता यावा, अशी विनंती केली होती. या विनंतीला आता रेल्वे बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने पत्र लिहून महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली होती. त्यावर अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत उद्यापासून महिलांना लोकल प्रवास सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. पण संसर्गाची शक्यता असल्याने आणि लोकलमध्ये गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेतर्फे महिलांना सकाळी अकरा ते दुपारी तीन आणि संध्याकाळी सात नंतर लोकल प्रवास करता येणार आहे. पण अत्यावश्यक सेवेतील महिलांना यापूर्वी देण्यात आलेल्या परवानगीनुसार प्रवास करता येणार आहे.

Leave a comment

0.0/5