पालकमंत्री अमिताभ बच्चन आहे का? नितेश राणेंनी सरकारी अधिकाऱ्याला दिली धमकी.
भाजप आमदार नितेश राणे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड वायरल होत आहे. पालकमंत्री म्हणजे अमिताभ बच्चन आहे का त्याला बघायसाठी जाताय, असे म्हणत शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांना नितेश राणेंनी चांगलेच खडेबोल सुनावले होते. तर तासाभरात लिंगडाळ गावात आला नाहीत तर तुमची मिरवणूक काढेल असा इशारा वजा धमकी राणे यांनी प्रसकीय अधिकाऱ्यांना दिली होती.
प्रकरण असे की, आमदार नितेश राणे सोमवारी देवगड-लिंगडाळ येथे शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. मात्र त्याचवेळी पालकमंत्री उदय सामंत यांचाही नुकसानग्रस्त शेतीचा पाहणी दौरा असल्याने सर्व अधिकारी पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. नितेश राणेंच्या दौऱ्यासाठी तलाठी, कृषी अधिकारी न आल्याने त्यांनी फोन करुन अधिकाऱ्यांना झापले होते. धमकीचा हा व्हिडीओ सध्या सिंधुदुर्गात प्रचंड वायरल होताना दिसत आहे.
निलेश राणे यांनी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या दुष्काळ दौऱ्यावर गेलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच झापलं होते. ‘अधिकाऱ्यांना खाली पाठव. उगाच तिथे लाड नको पालकमंत्र्यांचे.. तुम्ही एक जण राहू शकता, बाकीच्या लोकांना पाठवा ना.. तो काय अमिताभ बच्चन आहे का त्याला बघण्यासाठी जाताय सगळे.. कोण नाही इथे.. बोलून घ्या अधिकाऱ्यांशी पंचनामे करायला लावा.. बिचाऱ्या लोकांची हालत आहे” असे बोलून दाखविले होते.